विद्यापीठाच्या जमीन घोटाळयाची चौकशी करा : कृति समितीची मागणी

जळगाव प्रतिनिधी | येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील शेतकर्‍यांच्या जमीनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सन, १९९० मध्ये अधिग्रहित केलेल्या होत्या.  व त्यांना त्याचवेळी त्यावेळेच्या बाजाराभावाने मोबदला दिलेला होता. असे असतांनाही सुमारे २५ वर्षानंतर पुन:श्च शेतकर्‍यांना जास्तीचा मोबदला देण्याचे प्रलोभन दाखवून न्यायालयात जाण्यास प्रवृत्त करुन जमीन मोबदला  देण्याच्या कारणावरुन कोटयावधी रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक आरोप विद्यापीठ कृतिसमितीने केला आहे. या प्रकरणामध्ये प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर यांची भुमिका संशयास्पद असून कृती समिती आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे एका निवेदनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे.

विद्यापीठ कृती समितीने आज एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ.नि.कृ.ठाकरे यांनी एक एक पै वाचवून बखळ जमीनीवर शिक्षणाचे नंदनवन उभारलेले आहे. किंबहुना नैसर्गीक साधन सामग्री विद्यापीठातील त्यावेळेच्या कर्मचार्‍यांच्या व विद्यार्थ्यांच्या श्रमातून  बखळ जमीनीचे स्वरुप निसर्ग रम्य असे केलेले आहे.  तसेच  त्यांचा  कार्यकाळ संपल्यानंतर ते परत जातांना पंधरा कोटी रुपये रोखीने शिल्लक ठेवून गेलेले आहेत. ही बाब खान्देशातील शिक्षण प्रेमींना ज्ञात आहे.  असे असतांना विनाकारण किंवा काही दलालांच्या मध्यस्थीने विद्यापीठ निधीचा दुरुपयोग होत असेल तर, कबचौउमवितील कर्मचारी व कृति समिती सहन करणार नाहीत.  या संदर्भात शासनाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रथम कुलगुरु डॉ.निं.कृ.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्त आयोग नेमून संपुर्ण जमीन घोटाळयाची चौकशी निपक्षपातीपणे केली पाहिजे.  त्यासाठी कृति समिती प्रसिध्द माध्यमातून शासनाकडे विनंती करीत आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूज.

या संदर्भात कृतिसमितीचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला प्रश्न विचारले आहेत. यात विद्यापीठाने अधिग्रहित केलेल्या जमीनीचा संबंधित शेतकर्‍यांना त्यावेळेच्या बाजाराभावाप्रमाणे एकदा मोबदला दिलेला असतांना, संबंधित शेतकर्‍यांना पुन:श्च न्यायालयात जाण्याचा सल्ला कोणी दिला ? संबंधित शेतकरी न्यायालयात गेल्यावर विद्यापीठाची बाजू कोणत्या वकीलाने मांडली.  व त्यासाठी सदर वकीलाने विद्यापीठाकडून किती फि आकारली ?  सदर निकाल जिल्हा न्यायालयाचा असल्यास सदर निकाला विरुध्द विद्यापीठ में. उच्च न्यायालयात गेले आहे का ?  या प्रश्‍नांचा समावेश आहे. उच्च न्यायालयात जात नसल्यास त्यामागची  कारणे, विद्यापीठ परिसरातील जमिन घोटाळा पचनी पडल्यावर हाच पायंडा पुढे अमळनेर येथील विद्यापीठाच्या जमीनी संदर्भात दलालांमार्फत अशाच प्रकारे घोटाळा होण्याची शक्यता असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आलेला आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूज

दरम्यान, आज दि.१ ऑक्टोंबर, २०२१ रोजी विद्यापीठातील कृति समितीने पुकारलेल काळा फिती आंदोलनाचा  पाचवा दिवस असून, सर्व कर्मचार्‍यांचा उत्फुर्त प्रतिसाद आहे.  तसेच कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे दि.३०/९/२०२१ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या सभेस प्रभारी कुलगुरु डॉ.ई.वायुनंदन यांनी येण्याचे टाळले.    लाईव्ह ट्रेंडस न्यूज. तसेच कृति समितीच्या मागण्या मंजुर न झाल्यामुळे दि.४/१०/२०२१ पासून विद्यापीठ कर्मचार्‍यांचे लेखणीबंद आंदोलन सुरु होणार आहे. या संदर्भात कृति समिती लवकरच पत्रकार परिषद आयोजित करणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदावर विद्यापीठ कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष शरद पाटील, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, सचिव भैय्यासाहेब पाटील, कार्याध्यक्ष महेश पाटील, समन्वयक जगदीश सुरळकर आणि समन्वयक दुर्योधन साळुंखे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content