जागतिक वृक्षलागवड दिनानिमित्त शाहू नगर परिसरात वृक्षलागवड

जळगाव, प्रतिनिधी ।  भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल  कलाम पुस्तक भिशीतर्फे  जागतिक वृक्षलागवड दिनानिमित्त वृक्षलागवड करण्यात आली. 

जागतिक वृक्षलागवड दिनानिमित्ताने  २३ जुलै रोजी शाहु नगर परिसरात निम, जांभूळ, शिसम,काशीद या प्रजातीच्या वृक्षांची लागवड पत्रकार दीपक महाले, प्रकाशक युवराज माळी,  प्रकाशिका संगिता माळी, विजय लुल्हे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या हस्ते करण्यात आली. वृक्ष संगोपनाची जबाबदारी उत्स्फुर्तपणे शेख सगीर शेख बशीर, सुनिल महाजन यांनी घेतली. अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना प्रकाशक युवराज माळी यांनी जागतिक तापमान वाढ व वाहनांमुळे होणारे वायु प्रदुषण थांबविण्याचे आवाहन केले .वृक्षप्रेमी चित्रकार सुनिल दाभाडे यांनी वृक्षसंवर्धन समिती अध्यक्ष चंद्रशेखर नेवे व समन्वयक महेश शिंपी यांच्यातर्फे वृक्ष लागवडीसाठी रोप उपलब्ध करून दिली. प्रस्तावना संयोजक पुस्तक भिशीचे जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, सुत्रसंचालन सुनिल दाभाडे व आभार उषा सोनार यांनी मानले. यशस्वितेसाठी छाया पवार पाटील व ज्योती राणे,  आशा साळुंके, अभियंता मिलिंद काळे, मुख्याध्यापक हेमंत धांडे यांनी सहकार्य केले.

 

Protected Content