पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक दिव्यांग दिनानिमत्ताने तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्र्वर) येथे दिव्यांगाना बचत गट व व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्यात आले होते.
वृंदावन फाऊंडेशन व राजश्री शाहू महाराज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ३ डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनानिमत्ताने दिव्यांगासाठी बचत गट व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी येथील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. निलकंठ पाटील यांनी दिव्यांगानी शरीराने दिव्यांग असले तरी आपल्या बुध्दीने व मनाने बचत गट तसेच वैयक्तिक व्यवसायाच्या माध्यमातून आपला आथिर्क विकास करावा. यासाठी शासनाच्या व बँकांच्या सवलितींच्या फायदा घ्यावा. आपल्या सोबत आरोग्य व इतर मार्गदर्शन यासाठी वृंदावन फाऊंडेशन आपल्या सोबत आहे असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी विकास लोहार, देवगिरी बँक शाखाधिकारी, जनता बँकेच्या बचतगट प्रमुख, पिंपळगाव (हरेश्वर) येथील डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक तसेच सुमारे २५ दिव्यांग महीला, पुरुष उपस्थीत होते.