जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जाकीर हुसेन कॉलनीतील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याच्या अंगठ्या आणि रोकड असा एकुण ४९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत लक्ष्मण आंबडकर (बारी)(वय-२५, रा, जाकीर हुसेन कॉलनी) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता ते कामाचानिमित्ताने घर बंद करून बाहेर गावी गेले होते. चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत बंद घराचे कुलूप तोडून घरातून ३० हजार रुपयांची रोकड आणि १० ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या असा एकूण एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आले आहे. यासंदर्भात चंद्रकांत आंबडकर यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.