जळगाव शिवसेनेतील खांदेपालट सुनील महाजनांनी नाकारला

 

जळगाव : प्रतिनिधी । संपर्क प्रमुख २ दिवसांच्या भेटींसाठी जळगावात आलेले असले तरी जळगाव शिवसेनेत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा खांदेपालट होईल असे म्हणणे निरर्थक आहे , ताशा आशयाची अफवा सोशल मीडियावर असल्याची माहिती मलाही मिळाली आहे असा खुलासा आज महापालिकेतील विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी केला

यासंदर्भात ते पुढे म्हणाले कि , ज्यांना जायचे होते ते २०१८ च्या निवडणुकीतच शिवसेनेतून निघून गेले शिवसेनेचे नगरसेवक प्युअर शिवसेनेचेच आहेत . पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात आणि जिल्ह्यातील सेनेचे नगरसेवक काम करीत आहेत . फक्त खांदेपालट या विषयावर बोलण्यासाठी संपर्कप्रमुख संजय सावंत जळगावात आलेले आहे , असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही .महापालिकेत जे लोक पदांवर कार्यरत आहेत ते यापुढेही कार्यरत राहणार आहेत . यावेळी सुनील महाजन यांनीही नाथाभाऊंच्या शिवसेना प्रवेशाच्या मुद्द्यावर बोलणे टाळले

Protected Content