कुसुंबा शिवारातील मंदीरातून तांब्याची छत्री लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा शिवारातील एका शेतातून बोबडे बॉ महाराज यांच्या समाधीच्या मंदिरातील दगडी सिलावर लावलेली ३० हजार रूपये किंमतीची तांब्याची छत्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, कुसुंबा शिवारात यशवंत धनाजी पाटील यांच्या शेतात बोबडे बॉ महाराज यांची समाधी आहे. या समाधीच्या ठिकाणी गावकरी मिळून महाराजांच्या मंदिरातील दगडी शिलावर तांब्याचे छत्री व दोन घंटा बसवलेल्या होत्या. २२ सप्टेंबर रोजी वसंत नवल पाटील आणि त्यांचे पुतणे गजानन आत्माराम पाटील हे सायंकाळी पाच वाजता मंदिरात जाऊन पूजा अर्चना करून घरून निघून आले. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री समाधीवरील ३० हजार रुपये किमतीची ६ किलो वजनाचे तांब्याची छत्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. गावातील देवलाल पाटील, पंडित पाटील आणि सुनील पाटील हे सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता तेव्हा हा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी वसंत पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content