जळगाव शहरात नवीन ५६ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; धरणगाव, एरंडोल तालुक्यात संसर्ग वाढला

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज नवीन २०५ कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात विशेष म्हणजे जळगाव शहरासह एरंडोल, धरणगाव तालुक्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधित रूग्ण संख्या ६ हजार १६७ एवढी झाली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण २०५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ५६ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल एरंडोल २३, धरणगाव २२ तर भुसावळ १६ रूग्ण आढळले. तर अन्य ठिकाणांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-९, अमळनेर-८, चोपडा-९, पाचोरा -६, भडगाव-१, यावल-७, जामनेर -५, रावेर -११, पारोळा-१५, चाळीसगाव ४, मुक्ताईगर-७, बोदवड-५ व अन्य जिल्ह्यातील रूग्ण १ अशी रूग्ण संख्या आजचे तालुकानिहाय आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी याप्रमाणे
जळगाव शहर-१४७६, जळगाव ग्रामीण- २७०, भुसावळ-५७१, अमळनेर-४६७, चोपडा-४०५, पाचोरा-१३६, भडगाव-२७४, धरणगाव-२८१, यावल-३२४, एरंडोल-३०४, जामनेर-३४०, रावेर-४४१, पारोळा-३३०, चाळीसगाव-१५६, मुक्ताइनगर-१८५, बोदवड-१८९, अन्य जिल्हा-१८ अशी रूग्णांची आकडेवारी आहेत.

दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ६ हजार १६७ इतका झालेला आहे. यातील ३७४० रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१५१८; कोविड हॉस्पीटलमध्ये-१४२ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ४७८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६ मृत्यू झाले असून आजवरील एकुण मृतांची संख्या ३३५ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

Protected Content