जळगाव प्रतिनिधी । शहरातील धनाजी काळे नगरातील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर शहर पोलिसांनी छापा मारून साडे तीन हजारांची रोकड, १५ मोबाईल आणि दोन दुचाकी असा एकूण लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत १९ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात जुगाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
धनाजी काळे नगर भागातील एका शेतात असलेल्या घरामध्ये काही दिवसांपासून जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण निकम यांना मिळाली होती. कारवाईसाठी त्यांनी पथक नियुक्त करीत मंगळवारी दुपारी स्वत: पथकास धनाजी काळे नगरातील त्या जुगार अड्डयावर धाड टाकली़ पोलिसांना पाहताच काही जुगाऱ्यांनी तेथून पळ काढला. पण, पोलिसांनी जुगाऱ्यांना घेरत १९ जणांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळून साडे तीन हजार रूपयांची रोकड मिळून आली तर जुगाराचे साहित्य त्याचबरोबर १५ मोबाईल आणि दोन दुचाकीही त्यांच्याजवळ आढळून आल्या असून ते पोलिसांनी जप्त केले आहे.
यांच्यावर झाली कारवाई
पोलिसांनी हेमंत दिलीप शिराळ, गणेश पंढरीनाथ वानखेडे, हमीद शेख बाबू, सुनील संतोष जयकर, असलम शेख कय्युम, इम्रान खान आदीन खान, सैय्यद ईरशाद अली हुसेन, दीपक भिका मेंढे, साजीद सलीम खान, गणेश् माणिक महाजन, भोला नरसिंगदास बैरागी, शरीफ गुलमोहम्मद, भगवान सुरेश सोनवणे, शेख जमील शेख सरदार, अबू अशफाक गफूर, समाधान पंढरीनाथ चौधरी, प्रल्लाद शांताराम सोनवणे, दानिश हसन शेख, राजु गणपत चौरे या १९ जुगाºयांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरूण निकम यांच्यासह भरतसिंग पाटील, विजय निकुंभ, भारत पाटील, नरेंद्र ठाकरे, कमलेश पाटील, दीपक सोनवणे, रतन गिते, अशोक पाटील, गणेश पाटील, ओमप्रकाश पंचलिंग आदींनी ही कारवाई केली आहे.