जळगाव : मृत कोरोनाग्रस्ताचा पोलीस बंदोबस्तात दफनविधी !

 

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या संसर्गामुळे मृत झालेल्या रूग्णाच्या पार्थिवाचा आज सायंकाळी दफनविधी करण्यात आला. याप्रसंगी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर यावेळी आरोग्य विभागासह इतर शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते.

 

काल रात्री शहरात कोरोनाचा दुसरा पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला होता. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयातच उपचार सुरू करण्यात आले होते. तथापि, आज सकाळी त्याची प्रकृती बिघडली. यामुळे त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खूप खालावल्याने त्याने दुपारी तीनच्या सुमारास शेवटचा श्‍वास घेतला. कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करतांना अतिशय काळजी घ्यावी लागते. या अनुषंगाने संबंधीत रूग्ण मृत झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांना आधीच योग्य त्या सूचना दिल्या. यानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये संबंधीत रूग्णाच्या पार्थिवाला ‘सुपूर्द-ए-खाक’ करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर यावेळी आरोग्य विभागासह इतर शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते.

 

कोरोनाचा पॉझिटीव्ह ठरलेला रूग्ण हा शहरातील सालार नगर या भागात वास्तव्यास होता. त्याचे जोशीपेठेत गोडावून होते. खरं तर दूरवर प्रवास केला नसतांनाही या रूग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. काल रात्रीच सालार नगराचा भाग सील करण्यात आला आहे. या भागात बाहेरच्या लोकांना बंदी घालण्यात आली आहे. संबंधीत रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना संसर्ग झाला असल्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.

Protected Content