Home Cities जळगाव मनपा कर्जमुक्तीसाठी आमदार भोळे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

जळगाव मनपा कर्जमुक्तीसाठी आमदार भोळे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

0
35

जळगाव प्रतिनिधी । हुडको कर्ज प्रकरणी वन टाईम सेटलमेंट करत महापालिकेला विशेष बाब म्हणून निधी देत कर्जमुक्त करावे या मागणीसाठी आमदार राजुमामा भोळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

आमदार राजूमामा भोळे यांनी आज याबाबत माहिती दिली. शहरात घरकुल योजना राबविण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेने हुडकोकडून कर्ज घेतले आहे. या कर्जापोटी मनपा आडचणीत आली असून त्यातच सध्या मनपाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यामुळे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने आ. राजुमामा भोळे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

याबाबत माहिती देतांना आ. भोळे यांनी सांगितले की, मुंबईत मुख्यमंत्र्यांसह यापुर्वी तीन बैठका झाल्या आहे. त्यानुसार हुडको ४६२ कोटींवरुन २५० कोटींपर्यंत आली आहे. सध्या मनपची आर्थिक स्थिती २५० कोटी भरण्याची नाही. वन टाईम सेटलमेंट नुसर ३५ ते ४० कोटी मनपा भरु शकते. मात्र हुडको २५० कोटी मागत असल्याने कर्ज फेडीसाठी विषेश बाब म्हणून अनुदान मिळाले यासाठी मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थिने भेट घेणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound