Home Cities जळगाव जळगाव भाजपा अल्पसंख्याक मोर्चातर्फे गरजूंना किराणा साहित्याचे वाटप

जळगाव भाजपा अल्पसंख्याक मोर्चातर्फे गरजूंना किराणा साहित्याचे वाटप


 

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी शहरातील अनेक गरजूंना अत्यावश्यक किराणा पॅकेट्सचे नुकतेच वाटप केले. या पॅकेट्समध्ये गव्हाचे पीठ, साखर, तूरडाळ, तेल, मिरची पावडर, हळद, साबण, टूथपेस्ट आदी वस्तूंचा समावेश होता.

 

संपूर्ण भारतात मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. यात रोजंदारी व मोल मजुरी करणाऱ्या वर्गावर उपासमारीची वेळ आली असून, त्यांना या संकटसमयी मदतीचा हात देण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांच्या आवाहनानूसार व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या संकल्पनेतून जळगाव येथील भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी शहरातील अनेक गरजूंना अत्यावश्यक किराणा पॅकेट्सचे वाटप केले.

 

या पॅकेट्स मध्ये गव्हाचे पीठ, साखर, तूरडाळ, तेल, मिरची पावडर, हळद, साबण, टूथपेस्ट या वस्तूंचा समावेश होता. या वेळी त्यांच्या सोबत भाजप अल्पसंख्याक मोर्चा महानगर पदाधिकारी मोहम्मद नूर शेख, गुड्डू पठाण,फिरोज खान,अख्तर सैय्यद उपस्थित होते. सदर जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनांचे व सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करून, घरोघरी जावून गरजूंना वाटप करण्यात आले. सदर अल्पसंख्याक मोर्चाच्या या सामाजिक कार्यास खा. उन्मेशदादा पाटील,भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी शुभेच्छा व्यक्त करून मार्गदर्शन केले.


Protected Content

Play sound