जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात एका गावात राहणाऱ्या ३२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात ३२ वार्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. २ मार्च रोजी महिला ह्या रात्री ९ शौचालयासाठी जात होती. यावेळी धम्मा मुकुंद महाले या तरुणाने विवाहितेला “तू माझ्या घरात राहिली तर तुला काय त्रास आहे”, असे म्हटला. तसेच विवाहितेचा हात पकडून साडीचा पदर ओढुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे विवाहीतेसोबत कृत्य केले. याप्रकरणी माहितीने शुक्रवार ४ मार्च रोजी सायंकाळी विवाहितेने जळगाव तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल साहेबराव पाटील हे करीत आहेत.