जळगाव जिल्ह्यात आज आणखी सात कोरोनाचे रूग्ण आढळले ; रुग्णांची संख्या 244 वर पोहचली

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 91 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सात व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील पिंप्राळा, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन, भुसावळ येथील दोन, भडगाव येथील एक व खामगाव, जि. बुलडाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 244 इतकी झाली असून त्यापैकी 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर तीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Protected Content