जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात आज नवीन ५४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रूग्णाची संख्या २०७४ इतकी झाली आहे. यात , जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर,एरंडोल तालुक्यात रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे.
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर १३, जळगाव ग्रामीण ७, भुसावळ ३, अमळनेर ६, पाचोरा १, भडगाव ०, धरणगाव ३, यावल ५, एरंडोल ७, जामनेर ३, रावेर ४, पारोळा १, चाळीसगाव व मुक्ताईनगर ०, बोदवड १ रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय एकूण आकडेवारी
जळगाव शहर ३८१, जळगाव ग्रामीण ७५, भुसावळ ३३९, अमळनेर २५८, चोपडा १६४, पाचोरा ५०, भडगाव ९६, धरणगाव १०२, यावल १११, एरंडोल ७१, जामनेर १०३, रावेर १५४, पारोळा ११५, चाळीसगाव १९, मुक्ताईनगर १५, बोदवड १५ व इतर जिल्हा ६ असे एकूण आतापर्यंत जिल्ह्यात २०७४ रुग्ण झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ११८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.