पारोळा, प्रतिनिधी । तालुक्यातील सिध्दीविनायक जनरल व त्वचारोग हाँस्पीटलचे संचालक व श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.पृथ्वीराज श्रीराम पवार यांची राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा संपर्क म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
डॉ. पृथ्वीराज पवार यांच्या निवडीबद्दल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुर्यजीत पवार व कार्याध्यक्ष महेश पवार यांनी विशेष अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारतांना डॉ.पृथ्वीराज पवार यांनी राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजकारण विरहीत सामाजिक काम करण्याचे आश्वासन देत आभार व्यक्त केले. श्री छत्रपती प्रतिष्ठान टोळी व मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आध्यात्मिक, व्यवसायिक व शेतकरी बंधूच्या हिताकरीता आजपर्यंत जे कार्य हाती घेतले होते त्या कार्याला व्यापक स्वरुपात राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठान जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी बंधूंना सोबतीला घेऊन संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करण्याचे आश्वासन देखील दिले.
त्याचप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून राजकारण होत आहे अथवा संघटना राजकीय वळणावर जात आहे असे वाटेल त्यावेळी मी स्वतःहून माझ्या पदाचा त्याग करेल असे देखील डॉ.पृथ्वीराज पवार यांनी जाहीर केले. जिल्हा भरातील सर्वच राजकीय पक्षातील नेते,मराठा सेवा संघातील पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी डॉ.पवार यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.