जळगाव जिल्हा काँग्रेसचा भारत जोडो यात्रेत पायी चालतांना घेतला सहभाग

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।   भेंडवळ ते जळगाव (जामोद) या जळगाव जिल्ह्य़ातील हद्दीवरील रस्त्यावर खा. राहुल गांधी यांनी काढलेल्या “भारत जोडो” यात्रेत जळगाव जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला.

 

“भारत जोडो” यात्रेत कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, कन्हैयाकुमार यांच्या  सोबत जळगाव जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी यांना चालण्याचा योग आला. यात आ. शिरीष चौधरी, जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे, युवक तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, उध्दव वाणी, आशुतोष पवार, महीला जिल्हा अध्यक्षा सुलोचना वाघ, जळगाव शहर अध्यक्ष शाम तायडे, प्रतिभा मोरे, चंद्रकला इगंळे आदींचा सहभाग होता.

 

Protected Content