जळगाव प्रतिनिधी । शहरातील औद्योगिक वसाहतीतील के सेक्टरमधून ३० डिसेंबर रोजी पार्किंगला लावलेली कामगाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील मनवेल येथील गणेश रविंद्र पाटील (वय-२९) हे जळगाव एमआयडीसीमधील ईएसजी फायर पोर्टेक के-सेक्टर येथे गेल्या १ महिन्यांपासून कामाला आहे. मनवेल ते जळगाव असा दुचाकीने प्रवास करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ सीटी १८४१) क्रमांकाची दुचाकी आहे. ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दुचाकीने कामाला आले. कंपनीच्या बाहेर सर्व कामगारांच्या दुचाकी पार्किंगला लावली होती. दिवसभर काम करून सायंकाळी ७ वाजता घरीजाण्यासाठी निघाले असता त्यांनी दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी शोधाशोध केली परंतू मिळून न आल्याने त्यांनी ३० डिसेंबर रोजी ऑनलाईन तक्रार दाखल केली. पुन्हा दोन दिवस शोधाशोध करूनही मिळून न आल्याने १ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतूल पाटील करीत आहे.