Home क्राईम जळगाव एमआयडीसीतील कंपनीत आग

जळगाव एमआयडीसीतील कंपनीत आग

0
105

जळगाव प्रतिनिधी । शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असणार्‍या एमएन फुड या कंपनीला रात्री उशीरा आग लागल्याचे वृत्त असून यात गोदामाचे नुकसान झाले आहे.

शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात निलेश सुरतवाला यांच्या मालकीची एमएन फुडस् ही कंपनी आहे. रात्री दहाच्या सुमारास या कंपनीच्या गोदामाला अकस्मात आग लागली. परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन कंपनीतील फायर सेफ्टी प्रणालीच्या मदतीने आग विझवण्यास प्रारंभ केला. यानंतर महापालिकेच्या अग्निशमन पथकाने कंपनी गाठून तेथील आगा आटोक्यात आणली. रात्री उशीरापर्यंत आग विझवण्यात आल्याने यात नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळाली नाही.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound