जळगावात २७ डिसेंबर रोजी पुणे विद्यापीठाच्या एम-सेट परिक्षांचे नियोजन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील शैक्षणिक परिक्षा केंद्रावर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे महाराष्ट्र राज्यस्तरीय चाचणी अर्थात एम-सेट परीक्षा रविवार २७ डिसेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सेट परीक्षा केंद्रांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परिक्षा ह्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या परीसरातील केंद्र संकेतांक क्रमांक १४०१- स्वामी विवेकांनद भवन-अ, केंद्र संकेतांक क्र.१४०२- स्वामी विवेकांनद भवन-ब, केंद्र संकेतांक क्रमांक १४०३- के.सी.ई.चे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक १४०४- के.सी.ई.चे इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर, केंद्र संकेतांक क्रमांक १४०५- के.सी.ई.चे अभियांत्रिकी महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक १४०६- अॅड बबन बाहेती महाविद्यालय, केंद्र संकेतांक क्रमांक१४०७ पी.एन. लुंकड कन्या शाळा व केंद्र संकेतांक क्रमांक १४०८ ओरियन सीबीएसई स्कुल अशा एकूण आठ केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ३ हजार ४२० विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (हॉल तिकिट) setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यावर दिलेल्या सूचनांनुसार प्रवेशत्र डाऊनलोड करून घ्यावीत. यासाठी सेट परीक्षेचा अर्ज भरतांना वापरलेला लॉगीन आयडी व पासवर्ड चा उपयोग करावा. प्रवेश पत्र डाऊनलोड करतांना काही अडचणी आल्यास सेट परीक्षा केंद्राचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही. पवार यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content