जळगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने येणाऱ्या छोटा हत्ती धडकेत खासगी कामानिमित्त धुळ्याहून आलेल्या तरूण गंभीर जखमी झाला. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, किरण चंद्रकांत पाटील (वय-३१) आणि त्यांची पत्नी महिला पोलीस कॉन्स्टेबल नयना चौधरी-पाटील हे दोघे खासगी कामानिमित्त आज जळगावातील रेमन्ड चौफुलीवर आले होते. चौफुलीवर रिक्षासाठी थांबलेले असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या छोटा हत्ती क्रमांक (एमएच १९ बीएम ५८३२) ने धडक दिली. यात किरण पाटील हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान छोटा हत्ती वाहन पोलीसात जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.