जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोनाचा प्रादुरभाव रोखण्यासाठी कडकडीत लॉक डाऊन करण्यात आले आहे. तरीही विनाकारण फिरणाऱ्या लोकांना थांबवून घराबाहेर पडण्याचे कारण विचारले. विनाकारण फिरणाऱ्या 65 जणांवर 188 प्रमाणे कारवाई केली.पोलिसांनी 13 ते 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
मंगळवार 07 ते सोमवार 13 जुलैपर्यत जिल्हाधिकारी यांनी जळगाव, भुसावळ आणि अमळनेर या ठिकाणी कडकडीत बंद करण्यात आला आहे. काही एक कारण नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करण्यात आले आहे. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी चौकाचौकात खडा पहारा देत आहेत. जिल्हा पेठ पोलिसांनी आज सकाळपासून आकाशवाणी चौक, ख्वाजामिया चौक, गणेश कॉलनी, बहिनाबाई उद्यान, पिप्राला रोड इत्यादी ठिकाणी कारवाई केली. विनाकारण लॉक डाऊनमध्ये फिरणाऱ्या 65 जणांवर दंडात्मक कारवाईत केली. अशी कारवाई लॉकडाऊनपर्यत सुरू राहील, अशी माहिती जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली.