जळगाव, प्रतिनिधी | लहुजी ब्रिगेडच्या वतीने मनपा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तसेच उपेक्षित अनुसूचित जाती जमातीच्या न्याय्य हक्कांसाठी महापालिकेसमोर अध्यक्ष सुरेश आंभोरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
जळगाव महापालिकेच्या अस्थपणा सूचीवरील सफाई कामगारांच्या सन १९९७ पासून प्रलंबित असलेले ५२३ रिक्त पदे त्वरित भरणे. जळगाव महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्काने त्वरित नियुक्ती देण्यात यावी. जळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात यावे, सफाई कामगारांना हक्काचे निवास्थान जळगाव मनपातर्फे देण्यात यावे. सेवानिवृत्त मनपा कर्मचाऱ्यांचे तात्पुरता बंद केलेली पेन्शन विक्री सुरू करण्यात यावी यासह आदी मागण्यांसाठी लहुजी ब्रिगेड अध्यक्ष सुरेश अंभोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी लहुजी ब्रिगेड महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा आशा अंभोरे, लहुजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्षनिलू इंगळे, जिल्हा सरचिटणीस समाधान शिंदे, जळगाव महानगराध्यक्ष विमल मोरे, अल्पसंख्याक शेर खान, अल्पसंख्याक महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष फिरोजा पठाण, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शाकीर, युवा प्रदेशाध्यक्ष सागर अंभोरे आदी सहभागी झाले होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/509600027160725