जळगावात रिक्षा चालविणार्‍याचा परवाना होणार रद्द- जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन संपेपर्यंत जळगाव शहरात रिक्षा चालविण्यास मज्जाव करण्यात आला असून याचे उल्लंघन करणार्‍या चालकाचा परवाना रद्द करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असतांना याचे सर्रास उल्लंघन होतांना दिसून येत आहे. यात अनेक जण अकारण बाहेर फिरत असून रिक्षा चालकांना बंदी असतांनाही रस्त्यावर रिक्षा फिरत आहेत. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगाव शहरात रिक्षा, टॅक्सी व सायकल रिक्षा यांना सक्त बंदी घालण्याचे निर्देश दिलेले आहेत. याचे उल्लंघन करणार्‍यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून यात आरटीओ खात्याकडे तक्रार करून परवाना रद्द करण्याची तरतूद देखील असल्याचा इशारा या आदेशपत्रात देण्यात आलेला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार उद्या म्हणजेच २६ एप्रिलपासून शहरात रिक्षा चालविण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच जीवनावश्यक बाबींची खरेदी करण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन अनिवार्य करण्यात आले असून याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक देवीदास कुनगर यांनी एका पत्रकान्वये दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content