जळगाव प्रतिनिधी । शहरातील रात्री शतपावली करत मित्रांशी बोलत असतांना अज्ञात चोरट्याने दुचाकीवरून येवून मोबाईल लंपास केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला अटक केली. पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, २८ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी अतूल भास्कर पाटील (वय-३५) रा. आराधना मुयरेश अपार्टमेंट हे टागोर नगर येथे मित्रांसोबत बोलत असतांना अज्ञात तीन चोरट्यांनी दुचाकीवरून येवून हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून दुचाकीने पळ काढला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यातील जबरी चोरी, घरफोडी आणि दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीची कसून चौकशी करावी असे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी संबंधित पोलीस ठाण्यात देण्यात आले होत. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीअपरात्री एकटा व्यक्तीची संधी साधत त्याच्याजवळी मोबाईल किंवा चैन चोरून नेणारे परीसरात फिरत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी सफौ अशोक महाजन, पोहेकॉ अनिल जाधव, जितेंद्र पाटील, गफुर तडवी, दादाभाऊ पाटील, पोहेकॉ दिनेश बडगुजर, नरेंद्र वारूळे यांनी सापळा रचून संशयित आरोपी दिपक श्रावण सपकाळे (वय-२०) रा. तृप्ती कॉलनी, अयोध्यानगर याला ताब्यात घेतले. पोलीसांनी खाक्या दाखविताच मोबाईल हिसकावतांना सोबत संशयित आरोपी प्रकाश सुरेश नागपुरे आणि गणेश कमलाकर सुर्वे दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी यांनी मिळून केली होती अशी कबुली दिली होती. दरम्यान हे दोघे जिल्हा पेठ पोलीसा बलात्काराच्या गुन्ह्यात सबजेलमध्ये आहेत.