जळगाव प्रतिनिधी । आम्हाला कोणी न्याय देत नाही म्हणत पिंप्राळा येथील महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिती अशी की, शारदा श्रावण मोरे (३०,रा.पिंप्राळा, हुडको) असे या महिलेचे नाव आहे. मुख्यालयाचे हवालदार प्रकाश बळीराम मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बुधवारी सायंकाळी ६ वाजता शारदा मोरे ही पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात आली. पोर्चच्या बाहेर अचानकच आम्हाला कोणी न्याय देत नाही, असे म्हणत सोबत आणलेली रॉकेलची बाटली अंगावर ओतून ही बाटली फेकून दिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गार्ड ड्युटीचे प्रकाश मेढे, प्रसाद जोशी, राजेंद्र दोडे, मनोहर बाविस्कर, रवींद्र कोळी व दीपमाला सोनवणे यांनी धाव घेऊन महिलेला ताब्यात घेतले. महिलेच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.