जळगावात मनविसेतर्फे बस फलकाचे नामांकरण

mnvise

जळगाव प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत । महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शहरातून औरंगाबादकडे जाणार्‍या बसेसवर असलेल्या औरंगाबाद नावाच्या फलकावर संभाजी नगर नावाचे फलक लावून व बसचालक व वाहक तसेच प्रवाशींना पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

याबाबत सविस्तर असे की, १८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जळगाव शहराचे नविनबसस्थानक आगार व्यवस्थापक यांना बसस्थानकातील काही मोजक्या मागण्याचे निवेदन देण्यात आले होते. तसेच औरंगाबादला जाणार्‍या बसेसवर संभाजी नगर नावाचा उल्लेख असावा असा फलकाची मागणीही करण्यात आली होती. परंतु आगार व्यवस्थापकांनी ते फलक न लावल्याने १९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जळगावहून औरंगाबाद जाणार्‍या बसला पक्षातर्फे जळगाव- संभाजी नगर नावाचे फलक लावून व प्रवाशांना पेढे भरवून जल्लोष करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष मुकूंद रोटे, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, कुणाल पाटील, चेतन पाटील, योगेश पाटील, संदीप मांडोळे, संदीप पाटील, पंकज चौधरी यांच्यासह पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content