जळगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरची ट्रकला जोरदार धडक दिल्याने अपघातात ट्रक कलंडला असून ट्रक चालक किरकोळ जखमी झाला. या घटनेमुळे एक तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात करण्याचे काम सुरू होते.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बांभोरीकडून जळगावात जात असलेला डंपर क्रमांक (एमएच ३४ एम ६९०५) ने दादावाडी मंदीरासमोरील पर्यायी रस्त्यावर भरधाव वेगाने जात असतांना पुढे चालणारा ट्रक क्रमांक (एमएच ०४ जीसी ८०७८) ला मागून धडक दिली. त्यामुळे ट्रक हा जागीच फिरून क्लिनरच्या बाजूला कलंडला. या आपघातात ट्रक चालक हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातामुळे एक तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. अपघात झाल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी क्रेनच्या मदतीने कलंडलेला ट्रक बाजूला करण्यात आला व वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी अद्याप तालुका पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.