जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिमराव स्मृती प्लॉट परिसरात भर दिवसा बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक महिती अशी की, आशा भिमराव महाजन (वय-६५) रा. भिमराव स्मृती प्लॉट नं. ३७/१ जळगाव ह्या १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावलेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्या घरी आल्या असता त्यांना घराचा बंद दरवाजा उघडा दिसून आला. बंद दरवाजाचे कुलुप तोडून आत चोरी झाल्याचे दिसून आले. घरातील बेडरूम मधील कपाटामधील ४७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीन आणि १८ हजार रूपये रोख असे एकुण ६५ हजार रूपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दिलीप सोनार करीत आहे.