जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू रिक्षातून वाहतूक करीत असतांना एकाला अटक केली असून त्यांच्या ताब्यातील ८१ हजार रूपयांचा मुद्देमाला हस्तगत केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रशांत दिपक गुमाणे (वय-३२) रा. सिंगापूर, कंजरवाडा हा कंजरवाडाकडून सिंधीकॉलनी कडे एका प्रवाशी रिक्षात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू व दारू तयार करण्याचे साधन असे एकुण ४ कॅन आढळून आले. यात ८ हजार ४०० रूपये किंमतीचे १४० लिटर दारू, अडीच हजार रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन आणि ७० हजार रूपये किंमतीची रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ५८९८) ताब्यात घेतली. पो.ना. सचिन मुंढे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पोहेकॉ हर्षवर्धन सपकाळे, इम्रान सैय्यद, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ सचिन पाटील यांनी कारवाई केली.