जळगाव, प्रतिनिधी । कोरोना काळात वैद्यकीय सेवा देतांना मिशन मोड व टीम वर्क साधून कोरोना निर्मुलनासाठी गेल्या सात महिन्यात कठोर परिश्रम घेतले. त्यामुळे कोरोना जळगावात आटोक्यात आला. आटोक्यात आल्यानंतर आम्हाला कोरोना व्यतिरिक्तची सेवा खुली करता आली याचे श्रेय महाविद्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांना जाते असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. ते बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे आयोजित कोरोना योध्यांचा सत्कारप्रसंगी बोलत होते.
शहरातील बहुभाषिक ब्राम्हण संघातर्फे कोरोना काळात देवरूपी वैद्यकिय सेवा देणाऱ्या ४५ कोरोना योध्द्यांचा महापालिका आयुक्त सतिष कुळकर्णी, जिल्हा रूग्णालयाचे अधिष्ठात डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, डॉ. धर्मेंद्र पाटील, कोविड केअर सेंटर उप प्रमुख डॉ. शिरीष ठुसे , बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अशोक वाघ, बहुभाषिक ब्राह्मण महिला संघ जिल्हाध्यक्ष अमला पाठक आदी उपस्थित होते.
डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी मनोगतात कोरोनाच्या सद्यस्थितीविषयी माहीती दिली. तसेच सामाजिक कार्याच्या सीमा ठेऊ नका, कोरोना योद्धांचे मनोबल वाढविणे महत्वाचे असल्याचे डॉ. पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केले. तर आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले की, कोणी देव पहिला नसेल, मात्र तो कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन मदत करतो, डॉक्टर आपल्याला देवाच्या रुपात मिळतो. देवरूपी वैद्यकीय सेवेचा आपण कोरोना काळात धावा केला असल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली.
यावेळी कोविड योद्धा म्हणून कार्य करणारे, डॉक्टर, नर्स, समाजसेवक अशा ४५ कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. यात मनपा कोविड सेंटर उपप्रमुख डॉ. शिरीष ठुसे, डॉ. निलेश राव, डॉ. दीपिका ओक, डॉ. तुषार उपाध्ये, डॉ. अमृता देशपांडे, गोदावरी जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी, डॉ. अश्विनी टेणी, लक्ष्मीकांत त्रिपाठी डॉ. सुभाष वडोदकर, डॉ. क्षितीज गर्ग आदींचा सन्मान करण्यात आला. अशोक वाघ यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन पियुष रावळ व वैदेही नाखरे यांनी तर आभार बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी मानले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/762815280983351