जळगाव प्रतिनिधी । फ्लिपकार्टचे पार्सलची बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरूवारी दुपारी दृष्टी हॉस्पिटलसमोर घडली. याप्रकरणी रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, संजय सोपान पाटील (वय-३०) रा. ओम शांतीनगर, पिंप्राळा जळगाव हा तरूण गेल्या तीन ते चार वर्षांपासून फ्लिपकार्टचे पार्सल डिलेव्हरीचे काम करतो. काल २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता फिल्पकार्टचे पार्सल बॅगमध्ये वस्तू डिलेव्हरीसाठी बाहेर पडला. दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील रामा बिअर बार जवळील दृष्टी हॉस्पिटलमध्ये पार्सल देण्यासाठी आले. त्यांच्या बॅगमध्ये पार्सलचा सामान जास्त असल्याने त्यांनी बॅग दुचाकीवर ठेवून पार्सल देण्यासाठी गेले. दोन मिनीटात पार्सल देवून खाली आले असता त्यांच्या दुचाकीवरून आज्ञात चोरट्यांनी पार्सलची बॅग लंपास केली. बॅगेत विविध पार्सलचे एकुण ४२ हजार २०३ रूपये किंमतीचे सामान होते. संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय सोनार करीत आहे.