जळगाव, प्रतिनिधी । येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या ३४ कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज दुपारी नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी ३२ व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
कोविड रूग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या या दोघांव्यक्तीमध्ये जळगाव मारुतीपेठे एका २४ वर्षीय तरूणाचा समावेश आहे. तसेच दुसरी व्यक्ती २१ वर्षीय महिला ही चिचोंल, ता. बाळापूर, जि अकोला येथील असून ती जळगावातील समतानगर येथे राहत होती. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४५ इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आह.