जळगावात पुन्हा दुचाकी जाळली; अज्ञातांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट परीसरात घरासमोर लावलेल्या दुचाकीला अज्ञातांनी पेटवून दिल्याचा प्रकार मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. गेल्या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, आशिष कैलास तिवारी (वय-२७) रा. चौघुल प्लॉट, हनुमान मंदीराजवळ हे खासगी नोकरीला असून कामावर जाण्यासाठी मारूती सुझुकी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एडब्ल्यू २३९९) चा वापर करतात. १ मार्च २०२० रोजी रात्री १० वाजता जी.एस. मैदानावरील हिंदू जनजागृती सभा संपवून आशिष दुचाकीने घरी आला. दुचाकी घरासमोर पार्कींग करून रात्री जेवन करून झोपला. रात्री १ वाजता मोठ्याने स्फोट झाल्याचा आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या मावशींनी आवाज देवून दुचाकी पेटवून तीचा स्फोट झाल्याचे सांगितले. दरम्यान लागलेल्या आगीत दुचाकी जळून खाक झाली असून नुसता सांगळा उभा राहिला आहे. तसचे बाजूला दुसरी उभी असलेली दुचाकीचे देखील थोड्याफार प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी पहाटे ४ वाजता शनीपेठ पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासे पोहेकॉ महाजन करीत आहे.

Protected Content