जळगावात पावसाचा शिडकावा

 

 

जळगाव : प्रतिनिधी ।  तोते  चक्रीवादळामुळे केरळ आणि तामिळनाडूच्या जोरदार पावसाचा फटका  बसल्याच्या बातम्या कालपासून येत असताना आज  दुपारी जळगावातही  मान्सूनपूर्व पावसाचा शिडकावा झाला

 

हवामान खात्याने चक्रीवादळ आणि जोराच्या पावसाचा फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह गुजरात , केरळ आणि तामिळनाडूच्या बसू शकतो असा इशारा ३  दिवसांपूर्वीच दिला होता . या पार्शवभूमीवर सगळेच परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत . त्यातच आज सकाळपासून जळगाव शहर आणि परिसरातील वातावरण ढगाळ आणि गारवा जाणवले असे होते . उन्हाची तीव्रता फारशी नव्हती वादळाची परिस्थिती नसली तरी वातावरणातील हा बदल पावसाला   अनुकूल वाटत होता त्यानंतर दुपारी  जवळपास ५ मिनिट शहर आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा हलका शिडकावा झाला . पावसाच्या या शिडकाव्या नंतर  वातावरणातील दमटपणा वाढल्याचे जाणवत होते .

Protected Content