पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ हा कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जळगाव शहरात पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ हा कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीरा समोर महाबळ रोड, जळगाव येथे “सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा” या विषयावर १ डिसेंबर २०२२ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४.०० वाजता पत्रकार या अनुषांगाने माहिती देण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी १ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पत्रकार कार्यशाळा आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेसाठी आपण स्वतः उपस्थित रहावे, अथवा आपला प्रतिनिधी, कॅमेरामन, छायाचित्रकार यांनी उपस्थित राहावे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी दिली आहे.