जळगाव, प्रतिनिधी | जी.एम.फाऊंडेशन व भाजपा ओबीसी मोर्चा जळगाव महानगरतर्फे आरएमएस कॉलनी (शिव कॉलनी ) परीसरातमोफत कोवीड लसीकरण शिबीर व शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पुर्ण झाल्याचा आनंदोत्सवात साजरा करण्यात आला.
जी.एम. फाऊंडेशनच्या सहकार्य व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी ,सरचिटणीस विशाल त्रिपाठी, आर.व्ही. पाटील सर, महानगर अध्यक्ष ओबीसी मोर्चा जयेश भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्चा महीला जिल्हाध्यक्ष रेखा पाटील यांच्यातर्फे हनुमान मंदिर, आर.एम.एस कॉलनी (शिव कॉलनी) परीसरात गुरुवार २१ अॉक्टोंबर रोजी मोफत कोवीड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी भारत देशाने सर्वात आधी शंभर कोटी लसींचा डोस पुर्ण केल्याचा आनंदोत्सव पेढे वाटून साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर .सिमा भोळे, सरचिटणीस विजय बारी, शांताराम गवांडे, अध्यक्ष रविंद्र राव , भास्कर जुनागडे, ओबीसी मोर्चा युवक अध्यक्ष शुभम बाबा, चिटणीस दिपक भावसार,गुप्ताजी, महीला मोर्चा अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, युवक अध्यक्ष आनंद सपकाळे, चिटणीस राहुल मिस्तरी, जी.एम. फाऊंडेशन टिम अरविंद देशमुख, भुषण भोळे, होनाजी चव्हान, लसीकरण परीचारीका टिम- सि.अलका शरद उघडे, सि. सिमा पी.साखरे, सि. दर्शना क्षिरसागर व समाधान पवार हे उपस्थित होते. तरी एकुण लसीकरणात पहिला व दुसरा डोस (कोव्हीशिल्ड )असे ४७० लोकांचे लसीकरण करण्यात आले.