जळगावात दहा वर्षीय मुलीचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात पाणी भरण्याचा बहाण करुन दहा वर्षीय मुलीला घरी बोलावून तिचे कपडे काढून तिच्यासोबत अंगलटपणा करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात रविवार, ५ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका भागात अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसोबत राहते. रविवार, ५ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुणाने अल्पवयीन मुलीला पाण्याचा बहाणा करुन त्याच्या घरी बोलावले. यानंतर घराचा दरवाजा बंद केला, वाईट उद्देशाने मुलीचे अंगावरील कपडे काढून तिचे अंगावर चादर टाकून तिच्यासोबत अंगलटपणा करत तिचा विनयभंग केला. घरी परतल्यानंतर मुलीने हा प्रकार तिच्या आई वडीलांना सांगितला, त्यानंतर मुलीच्या वडीलांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन विनयभंग करणाऱ्या रोहित युवराज भावसार या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक जगदाळे हे करीत आहेत.

Protected Content