जळगाव प्रतिनिधी । घराला का लाथा मारल्या असा जाब विचारल्याचा राग येऊन वडिलांसह मुलांनी तरुणाला हाताबुक्यानी मारहाणं केल्याची घटना शनिवारी दुपारी खंडेराव नगरात घडली.या प्रकरणी तक्रारीवरून शनिवारी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, इम्रान गफार खान (वय-२७) हा तरुण कुटूंबासह खंडेराव नगरात वास्तव्यास आहे. दरम्यान शुक्रवारी १२ जून रोजी दुपारी इम्रान घरात असतांना त्याच परिसरातील दीपा पूर्ण नाव माहीत नाही तसेच त्याच्या मुलांनी घराला लाथा मारल्या. हा प्रकार समजल्यावर जाब विचारला असता दीपा व त्याच्या तीन मुलांनी शिवीगाळ करत इम्रान यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेत तरुणाला दुखापत झाली. शनिवारी दुपारी इम्रान यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला जाऊन संशयित पिता पुत्राविरुद्ध तक्रार दिली.