जळगाव प्रतिनिधी। शहरातील तंबापुरा भागातील रहिवासी असणार्या एका तरुणाचा गुप्तीने वार करून खून केल्याची घटना रात्री हॉटेल कस्तुरीजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील तांबापुरा भागात राहणारा बबलू हटकर या तरुणावर अज्ञात व्यक्तीने रात्री दहा वाजेच्या सुमारास गुप्तीने वार करून खून केल्याची घटना एमआयडीसी परिसरातील हॉटेल कस्तुरी जवळ घडली. रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, हा खून पूर्व वैमनस्यातून होता की यामागे आणखी काही कारण आहे ? यात एकापेक्षा जास्त हल्लेखोर होते का ? याबाबतची माहिती पोलीस प्रशासनातर्फे घेतली जात आहे.