फैजपूर कोरोना कोविड सेंटर मधील ८१ रिपोर्ट प्रलंबित

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना जे. टी. महाजन कॉलेजमधील कोरोना कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आलेल्या ८१ संशयित रूग्णांचे रिपोर्ट प्रलंबीत असल्याने त्यांना काही समजेनासे झाले आहे. यात अधिकार्‍यांच्या संपर्कातील १९ पोलीस कर्मचार्‍यांचही समावेश आहे.

याबाबत वृत्त असे की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने सर्व जण धास्तावले आहेत. यातच फैजपूर शहरात सुरवातीला २ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याने खळबळ उडाली होती त्यानंतर फैजपूर शहर कोरोनामुक्त झाले होते. मात्र काही दिवसांमध्येच शहरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून पोलीस अधिकारी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरून केली आहे. यात त्यांच्या संपर्कातील १९ कर्मचारी यांचे स्वब घेतले असून अवाहल प्रलंबित आहे फैजपूर कोरोना कोविड सेंटर मधील ८१ संयशीयत रुग्णाचे आवाहल प्रलंबित आहे हे स्वॅब घेऊन ४ दिवस झाले असले तरी अवाहल प्रलंबित असल्याने सर्व शहरवासीयांचे लक्ष याकडे लागले आहे. रिपोर्ट लवकर आले तर संबंधीत रूग्णांवर तातडीने उपचार सुरू होऊन तो बरा होऊ शकतो. यासोबत ज्यांचे अहवाल निगेटीव्ह येतील त्यांची काळजी दूर होऊ शकते. यामुळे कोरोनाचे निदान लवकर होण्याची गरज असल्याचा सूर नागरिकांमधून निघत आहे.

Protected Content