जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे. मात्र याचा परिणाम गरीब व गरजू कुटुंबांना उपासमारी ओढावली आहे. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गायझेशन (जीतो)तर्फे शहरातील विविध भागात जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनचा अधिक फटका मजूर वर्गाचे होत आहे. त्यांच्यावर रोजगाराच्या अभावामुळे गरीब कुटुंबांना उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, उपविभागीय अधिकारी दिपमाला चवरे यांच्या मार्गदर्शनाने जळगांव शहरात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो)तर्फे पिंप्राळा, हरीविठ्ठल नगर, खंडेराव नगर, गुरुनानक नगर, शानिपेठ मधील हात मजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची किट ( गहू, तांदूळ, तेल, दाळ) तयार करण्यात आले. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, शनी पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, जीतोचे अध्यक्ष अजय ललवाणी, सेक्रेटरी दर्शन टाटीया यांच्याहस्ते सुमारे २६० कुटुंबाना वाटप करण्यात आली. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन मार्फत फूड पॅकेट ही वाटप करण्यात येत असून पुढे सुध्दा ८०० कुटुंबांना किट पोहचवण्याचा मानस आहे.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रम यशस्वितेसाठी पारस राका, विनोद ठोले, स्वरूप लुंकड़, तेजस कावड़िया, महेंद्र जैन, आदेश ललवाणी, प्रदीप नवलखा, हेमंत कोठारी, प्रवीण छाजेड, मनोज पाटनी, नरेश कोठारी, प्रियेश छाजेड़, युगांत संघवी, हितेश पारख, अक्षय गादिया यांनी परिश्रम घेतले.