जळगावात जिल्हास्तरीय हनुमान चालीसा पठण स्पर्धा

hanumanchalisa

जळगाव प्रतिनिधी । युवा विकास फाऊंडेशन, सिध्दीविनायक मानव कल्याण मिशन नाशिक तसेच विष्णु भंगाळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादाप्रमाणे यावर्षीयही सुनील भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शनिवारी सकाळी जिल्हास्तरीय हनुमान चालीसा पठण स्पर्धा झाली. या स्पर्धेत जिल्हाभरातील विविध शाळांमधील 1100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी 1100 विद्यार्थ्यांनी एकाचवेळी हनुमान चालीसा म्हटली. यामुळे लेवा भवन परिसरात चैतन्य पसरले होते.

मान्यवरांचे हस्ते उद्घाटन
यावेळी चिमुकले राम मंदीराचे पुज्य दादा महाराज जोशी यांच्याहस्ते स्पर्धेचे द्विपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुनील भंगाळे, स्वामी नारायण मंदीराचे गोविंद शास्त्री, विद्या प्रबोधिनीचे, मधुकरराव चौधरी, प्रा. राजेंद्र वाघुळदे, उद्योजक भाईजी मुंदडा, कैलास माळी, नितीन चोरडीया, लखीचंद जैन, धनुमामा तळेले, रूपेश चौधरी, सेन्ट्रल झोनचे सदस्य सचिन अग्रवाल, मनिष अत्तरदे, ब्रिजेश जैन, खालीद बादशहा, दिनेश मालू, सुप्रभा इंटरप्राईजेसचे पंकज पाटील, गणेश मेडीकल एजन्सीचे राजेश पाटील, संघ प्रचारक नंदू गिरगे यांच्यासह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सरदार वल्लभभाई पटेल तसेच सरस्वती मातेच्या पूजनही मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. विष्णू भंगाळे यांच्यातर्फे उपस्थित मान्यवरांचा यावेळी शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात विष्णू भंगाळे यांनी स्पर्धेमागील उद्देश स्पष्ट केला.

1170 विद्यार्थ्यांनी एकासुरात म्हटली हनुमान चालीसा
यानंतर विवेकानंद स्कूलचा पहिलीचा विद्यार्थी हर्षद किशोर पाटील या विद्यार्थ्यांच्या पाठापोठ उपस्थित विविध शाळांतील 1170 विद्यार्थ्यांनी हनुमान चाळीसा म्हटली. यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. पहिली ते दहावी या वयोगटात वैयक्तिक तसेच समूह अशा प्रकारात ही स्पर्धा पार पडली. सभागृहाच्या बाजूला मंडपावरील क्रमांकाचे प्रत्येकाने टोकन देण्यात आलेले होते. त्यानुसार मंडपात वैयक्तिक तसेच समहूप्रकारात स्पर्धा पार पडली. हार्मोनिअम, तबला, नाल या वाद्यासह काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा पठण केले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक तसेच शिक्षकांचीह उपस्थिती होती.

मनुष्य हा विचाराने महान होतो.
यावेळी दादा महाराज यांनी मनोगतात, संपत्ती तसेच शरीराने माणूस जरी महान होतो पण मनुष्याने त्याच्या विचाराने महान झाले पाहिजे. गणपतीची कथा सांगितली. तसेच गणपती ज्याप्रमाणे आई पार्वती गुरु होती. त्याप्रमाणे सर्वांची गुरु ही आई असते, त्यामुळे आईला कुणीही त्रास देवू नये, आईचे मनाप्रमाणे प्रत्येकाने वागले पाहिजे, जो आईचे एैकतो त्याला जीवनात सर्वत्र यश मिळत, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. स्पर्धेनंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम तसेच पारितोषिकाचेही वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन दिपक पाटील सर यांनी केले.

Protected Content