जळगाव प्रतिनिधी । घराकडे जाणार्या इसमाचया चाकूचा धाक दाखवित त्याची मोटारसायकल, रोख रक्कम व मोबाईल लुटल्याची घटना शनिवारी कंवरनगर परिसरात घडली. याप्रकरणी फरार असलेला संशयित आरोपी राकेश शिंदे उर्फ चिच्या याला पोलिसांनी पाळधी बसस्थानकातून अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
शहरातील रामनगर परिसरातील संतोष दिगंबर ढिवरे हे शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही कामानिमीत्त बी. जे. मार्केट परिसरात गेले होते. काम आटोपून संतोष हे आपल्या मोटारसायकलने घराकडे जात होते. यावेळी मेहरुण परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ त्यांना त्यांचा भाचा सिद्धांत बाविस्कर याठिकाणी भेटाला असता संतोष हे त्याच्यासोबत बोलत उभे होते. यावेळी नागसेन नगरातील रितेश शिंदे उर्फ चिच्या हा त्यांच्या दुचाकीवर मागे येवून बसला. त्याने चाकूचा धाक दाखवून संतोष ढिवरे याचा मोबाईल, चांदीची साखळी यासह काही रोख रक्कम व मोटारसायकल घेवून तो पसार झाला होता. एमआयडीसी पोलिसात याप्रकरणी राकेश शिंदे उर्फ चिच्या याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
पाळधी बसस्थानकावरुन केली अटक
चिच्या हा पाळधी बसस्थानकात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील यांना मिळाली. त्यांनी तात्काळ हेमंत कळसकर, मुकेश पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील यांच्यासोबत पाळधी बसस्थानक गाठले. याठिकाणी चिच्या झोपलेला असल्याने पोलिसानी त्याला याठिकाणाहून अटक केली असून त्याच्याकडून मोटारसायकल, चांदीच चैन व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याची १६ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे