जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सुप्रीम कोर्टाने ओबीसीआरक्षण सांदर्भात २७ टक्के आरक्षणाचा निकाल दिला असून या निकालाचा जळगाव जिल्ह्याचे वतीने आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषध्येचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या आदेशानुसार वेळोवेळी, जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बैठका, आंदोलन, उपोषण, भव्य मोर्चाचे आंदोलने वेळोवेळी करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहेत. याच अनुषंगाने आज जळगाव शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने फटाके फोडून व पेढे भरवून फुले नगरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध संघटना, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, मुरलीधर राजाराम महाजन, संतोष इंगळे, प्रकाश महाजन, ज्ञानेश्वर महाजन, नगरसेवक सरिता नेरकर, प्रतिभा शिरसाठ, अमोल कोल्हे, निवेदिता ताठे, भारती काळे, सुनील माळी, रामू सैनी ,गोकुळ महाजन, राजू देशमुख, तुषार वाघूळदे, कृष्णा माळी, वाल्मिक महाजन, शुभम नेरकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.