जळगाव प्रतिनिधी । बौद्ध समाज वधू वर परिचय ग्रुप व वेबसाईड जळगावच्या माध्यमातून अखिल महाराष्ट्र बौद्ध समाज वधुवर परिचय मेळावा नुकताच ऑनलाईन संपन्न झाला.
सदर मेळावा हा ऑनलाईन पद्धतीने ‘गुगल मिट’ या अप्लिकेशनचा वापर करून घेण्यात आला. कोणत्याही प्रकारची फी न आकारात निशुक्ल घेण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रभरातून अनेक मुले मुली यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपापला परिचय देत सर्वांनी आपला सहजीवन साथी कसा असावा या विषयी आपल्या अपेक्षा मुक्तपणे व्यक्त केल्या. मुलींच्या पालकांनी फक्त सरकारी नोकरीची अपेक्षा न करता चांगला व्यवस्थित असलेल्या मुलांविषयी सुद्धा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच नोकरी असलेल्या मुला मुलींनी सुद्धा आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवणे काळाची गरज आहे असे ग्रुप चे संस्थापक योगेश भालेराव सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रुपच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा न करता काम करत आहे. आपण सर्वांनी आम्हाला वेळेनुसार सहकार्य करावे अशी भावना ग्रुपचे सल्लागार नितीन भालेराव यांनी व्यक्त केली.