जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्यापासून तीन दिवस अर्थात १५ ते १७ मे दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी बांधवानी यांला पाठिंबा दर्शविला आहे. या तीन दिवसात दाणाबाजारातील सर्व व्यवहार होणार नाही.
सध्या जळगाव शहरात कोरोनाचे ३९रूग्ण आहे. त्या पार्श्वभूमीवर दाणाबाजारासह इतर व्यापाऱ्यांनी देखील स्वत:हून जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. लोकांच्या आरोग्यासाठी स्वतहून निर्णय घेतला असून व्यापाऱ्यासह जनतेने प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन व सर्व राजकिय पक्षांतर्फे सुध्दा स्वयंस्फूर्तीचे जनता कर्फ्यू पाळू या, घरातच राहू या आणि कोरोनाला हरवू या’ असे आवाहन जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, कॉग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढत असून कोठेतरी हा निर्णय घेण्याचे गरजेचे असल्याने सर्वपक्षिय आवाहन देखील करण्यात आले आहे.