जळगावात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या चौघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । बसस्थानकाचा पत्ता विचारणाऱ्या अल्पवयीन मुलाला दुचाकीवर बसवून कोल्हे हिल्स येथील निर्जळ ठिकाणी नेत अश्लिल चाळे करत अनैसर्गिक कृत्य केल्याचा खळबळजनक प्रकार ५ मार्च रोजी घडला होता. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ७ मार्च रोजी या गुन्ह्यातील तीन जणांना मालेगाव तर एकाला जळगावातून अटक केली आहे. न्यायालयाने चौघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सम्राट नागेंद्रमणी त्रिपाठी (वय-२०) रा. खुबचंद साहित्या नगर, सुप्रिम कॉलनी, शिव पवन इंवर (वय-२०), मनिष उर्फ सनी राजेंद्र कोळी (वय-२०), ऋषीकेश माधवराव मोरे (पाटील) (वय-२१) तिघे रा. रा.सदगुरू नगर, अयोध्यानगर अशी अटक केलेल्या चार संशयित आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय तरूण ५ मार्च रोजी दुपारी बसने जळगावात आला होता. शिवाजीनगरात उतरल्यानंतर रेल्वेरुळ ओलांडून तो तहसिल कार्यालयाजवळ आला होता. तेथे त्याने दुचाकीस्वार असलेला ऋषीकेश मोरेला बसस्थानकाचा पत्ता विचारला. पत्ता न सांगता ऋषीकेशने अल्पवयीन मुलाला लिफ्ट दिली. परंतु, त्याला बसस्थानकात न घेऊन जाता वाघ नगरातील कोल्हे हिल्स येथील निर्जळ ठिकाणी नेले. त्याठिकाणी सम्राट नागेंद्रमणी त्रिपाठी, शिव पवन इंवर आणि मनिष उर्फ सनी राजेंद्र कोळी हे तिन्ही संशयित आरोपी आले. चारही भामट्यांनी अल्पवयीन मुलासोबत अश्लिल चाळे करत अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर मुलाला मारहाण करून त्याच्या कानातील सोन्याची बायी, हातातील मोबाईल व खिश्यातील ५०० रूपये रोख रक्कम जबरी हिसकावून घेतली. अजून काही आहे का ? याची तपासणीसाठी त्यांनी त्यांची बॅग तपासली. बँकेचे पासबुक सापडले. त्यांनी थेट पिडीत मुलाला दुचाकीने एसबीआयच्या मुख्य शाखेत आणले. पासबुकवर एंट्री मारल्यानंतर बॅलन्स चेकरून घेतला. मात्र खात्यात काही नसल्याचे निषन्न झाल्यानंतर चारही संशयित आरोपींनी बॅकेतून पळ काढला. तत्पूर्वी चौघांनी नितीनला पोलीसात न जाण्याचीही धमकी दिली होती.  याप्रकरणी पिडीत मुलाच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पिडीत मुलाने सुरूवातीला मारहाण व लुटल्याची माहिती पोलीसांना दिल्यावरून रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलगा घरी गेल्यानंतर आपल्यासोबतची आपबिती आपल्या आईवडीलांना सांगितली. घाबरलेल्या अवस्थेत खरी घटना सांगितली असता डिसेंबर २०१९ पासून सदरील चारही आरोपी हे पिडीत मुलाच्या मुळ गावाला जावून घराबाहेर त्याला बोलावले. त्याला दुचाकीवर बसवून निर्जळ ठिकाणी नेवून चारही संशयित आरोपींनी पिडीत मुलावर अनैसर्गिक कृत्य केले. त्यावेळी चौघांनी याचे व्हिडीओ केले व वारंवार व्हिडीओची दाखविण्याची धमकी देवून आतापर्यंत ७० हजार रूपये रोख घेतले. असे सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी पिडीत मुलगा आपल्या आईवडीलांसह आल्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय येरूडे यांनी सर्व हकीकत सांगितली. पुरवणी जबाबावरून चारही आरोपींविरूध्द लैंगिक छळ, मारहाण, लुटमार प्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला.

शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित चारही आरोपी हे शिर्डी येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांनी तत्काळ पोलीस कॉन्स्टेबल बशिर तडवी, अक्रम शेख, भास्कर ठाकरे आणि तेजस मराठे या पथकाला शिर्डी येथे ६ मार्च रोजी सकाळी रवाना केले. दरम्यान, पोलीस आपल्या मागावर असल्याचे चारही संशयितांना सुगावा लागल्यानंतर मालेगावकडे पसार झाले. मालेगाव येथील मनमाड फाट्याजवळ ७ मार्च रोजी रात्री २ वाजता  सम्राट नागेंद्रमणी त्रिपाठी, शिव पवन इंवर आणि मनिष उर्फ सनी राजेंद्र कोळी यांना शहर पोलीसांनी अटक केली तर ऋषीकेश मोरे याला ८ मार्च रोजी जळगावातून पोहेकॉ विजय निकुंभ, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, पो.कॉ. रतन गिते, नासिर शेख, योगेश इंधाटे यांनी अटक केली आहे. चौघांवर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना आज न्यायालयात हजर केले असता १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

Protected Content