Home क्राईम जळगावातून तरूणीच्या बॅगमधून २०० रुपयांची चोरी; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगावातून तरूणीच्या बॅगमधून २०० रुपयांची चोरी; दोन जणांवर गुन्हा दाखल


जळगाव प्रतिनिधी । शहरातील खान्देशमिल परिसरात एका वसतिगृहातील तरूणीच्या बॅगमधून दोनशे रुपयांची चोरी झाल्याची घटना  शुक्रवार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी पैसे चोरीचा संशय
असलेल्या दोन तरुणींविरुध्द शनिवार ९ ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खान्देश मिल परिसरात डॉ रचना मंत्री यांच्या नावाने असलेल्या वसतिगृहात  रामेश्वर कॉलनी येथील वैशाली रोहिदास झाल्टे वय २५ ही तरुणी वास्तव्यास आहे. वस्तीगृहातून वैशाली झाल्टे या तरूणीच्या बॅगमध्ये असलेल्या एक हजार रुपयांपैकी २०० रुपयांची चोरी झाली. याप्रकरणी वैशाली झालटे हिच्या तक्रारीवरून दोन तरुणीविरुध्द शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक अलका शिंदे या करीत आहेत .


Protected Content

Play sound