जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट येथील व्यापाऱ्याच्या कार्यालयात दोन जणांनी विश्वास संपादन करून बँकेकडून दोन डंपर खरेदी करण्यास सांगून तब्बल ६२ लाख ६२ हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राहूल जयप्रकाश बाविस्कर (वय-३१) रा. टेलिफोन नगर, जळगाव हा तरूण कुटुंबासह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतो. रोहन विजय वैद्य अणि विजय वैद्य दोन्ही रा. सेनापती बापट रोड, मुंबई हे दोघे राहूल बाविस्कर याचे ओळखीच आहे. दोघांनी राहूलचा विश्वास संपादन करून बँकेकडून दोन डंपर खेरी करण्यास सांगितले. त्यानुसार राहूलने बँकेतून कर्ज काढून सन २०१८ मध्ये डंपर खरेदी केले. त्यानंतर डंपरचे मासिक हप्ते ६० हजार रूपये काररनामा नुसार देण्याचे दोघांनी ठरविले. दरम्यान, त्यांनी मासिक हप्ते थकवले. आणि शिवाय राहूल कडून १० लाख रूपये घेतले. असे एकुण ६२ लाख ६२ हजारांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राहूल बाविस्कर याने मंगळवारी २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोहन विजय वैद्य अणि विजय वैद्य दोन्ही रा. सेनापती बापट रोड, मुंबई यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रविंद्र सोनार करीत आहे.