जळगाव प्रतिनिधी । भारत विकास परिषदेच्या वतीने कोरोना संदर्भात निबंध स्पर्धा २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धा सर्वांसाठी खूली असून २७ एप्रिल २०२० पर्यंत इच्छुकांनी निंबध संबंधित मेल किंवा व्हॉटसॲप नंबरवर पाठवावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे.
भारत विकास परिषद जळगावतर्फे कोरोना लॉकडाऊनचा कंटाळा, निंबध लिखाण करून घालवू या ! असे आवाहन करत, १. मज मी उमगलो !, २. समाजशिस्त आणि मी… ३. “कोरोना” नंतरचे जग या तीन विषयावर वर्तमान परिस्थितीत आपले विचार आणि दृष्टीकोन ठेवून निंबंध लिहावा.
नियम व अटी
१. निंबध हे ई-मेल व व्हॉटस्ॲपवरच स्विकारले जातील,
२. निबंध मराठी किंवा हिंदी असावा
३. आपले नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.
४. निबंध कमीत कमी १००० ते जास्तीत जास्त १५०० शब्द मर्यादा असावी.
५. परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य असेल.
६. स्पर्धा सर्वांसाठी असून प्रवेश विनामुल्य आहे.
पारितोषिक
प्रथम – २१००, द्वितीय-१५००, तृतीय- ११००, चतुर्थ ७५०, पाचवे- ५०० आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागिता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एक अनोखी निबंध स्पर्धा
वैश्विक महामारी करोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात आणि जगातील बऱ्याच देशात लॉकडाऊन केलेले आहे. ह्या लोकडाऊनमध्ये आपण सर्वजण घरातच थांबून आहात, सर्व शाळा, कॉलेज, ऑफिस, कारखाने… काही व्यवस्था वगळता जवळपास सर्वच बंद बंद आहे. ह्या लॉकडाऊन मधील आपले अनुभव सादर करण्यासाठी एक नामी संधी.
स्पर्धा सर्वांसाठी खुली
असून कुठलीही वयाची अट नाही. निंबध हा [email protected] किंवा ७०६६३१४४४४ वर पाठवावे. निबंध पाठविण्याचे अंतिम मुदत २७ एप्रिल २०२० पर्यंत असून लवकरात लवकर निबंध पाठविण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे..